Optical Illusion Challenge: सोशल मीडियावर अलिकडे ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा चांगला बोलबाला आहे. मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोंमधील रहस्य शोधणं लोकांनाही खूप आवडतं. कारण ऑप्टिकल इल्यूजन ही एक ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याची चांगली पद्धत आहे.
ऑप्टिकल इल्यूजन कोणत्या आकारात किंवा रूपात असू शकतं. जसे की, फोटो, पझल, पेंटिंग, व्हिडीओ इत्यादी इत्यादी. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या खेळण्याच्या पत्त्यात तुम्हाला तिसरा नंबर शोधायचा आहे.
तुम्ही कधीना कधी प्लेइंग कार्ड नक्कीच खेळले असाल. प्लेइंग कार्डमध्ये 1 ते 10 नंबर असतात. ज्यात चार प्रकारचे क्लब्स, डायमंड्स, हार्ट्स आणि स्पेड्स असतात. सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे तो रेड डायमंडचा आठवा नंबर आहे. आता तुमच्यासमोर चॅलेंज हे आहे की, या फोटोत दोन 8 नंबर तर दिसत आहेत. तुम्हाला यातील तिसरा 8 नंबर शोधून काढायचा आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.
कार्डच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला 8 नंबर दोन वेळा दिला आहे. आता तिसरा 8 नंबर शोधण्यासाठी तुम्हाला फोटोकडे बारकाईने बघावा लागेल. जर तुम्ही रेड डायमंड्सची साइज व्यवस्थित बघाल तर जिमिट्रिक पॅटर्नच्या सेंटरमध्ये तुम्हाला तिसरा 8 नंबर दिसेल.
ब्रिटेन गॉट टॅलेंटचा एका स्पर्धक जेमी रेवेनने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.