Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो भरभरून शेअर होत असतात. याकडे लोक एक चांगला टाइमपास म्हणून बघतात. कारण या फोटोंमध्ये काहीतरी रहस्य, काहीतरी गुपित दडलेलं असते जे तुम्हाला शोधायचं असतं. याने एकतर वेळही चांगला जातो आणि बुद्धीलाही चालना मिळते. भ्रम निर्माण करणारे हे फोटो लोकांना खूपच हैराण करतात. काहींना लगेच यातील उत्तरं सापडतात, पण काही लोक मात्र अनेक प्रयत्न करूनही फेल होतात.
या फोटोंबाबतची एक गंमत अशीही आहे की, जर कुणी एकदा या फोटोतील रहस्य शोधण्यामागे लागलं तर उत्तर मिळाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. भलेही त्यासाठी कितीही वेळ लागो. पण काही लोक लगेच हार मानतात आणि हा नाद सोडून देतात. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही एक पेंटिंग असून त्यात सात चेहरे आहेत. पण लोकांना केवळ तीनच दिसत आहेत.
हा फोटो एका वृद्ध व्यक्तीचा आहे आणि यातील सात चेहरे शोधणं खरंच आव्हानात्मक आहे. भलेभले लोक या फोटोतील सात चेहरे शोधू शकत नाहीयेत. मात्र, असेही काही लोक आहेत ज्यांनी आपल्या तीक्ष्ण नजरेने यातील सात चेहरे शोधून दाखवले.
तुम्हाला जर अनेक प्रयत्न करूनही यात केवळ ३ चेहरे दिसत असतील, तुम्हाला सात चेहरे दिसले नसतील तर चिंता करू नका. याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो. नाही तर झोपेतही तुम्हाला सात चेहरे न सापडल्याची चिंता लागून राहिल.
सात चेहरे कुठे कुठे आहेत त्यांना या फोटोत राऊंड केले आहेत.