Optical Illusion : सोशल मीडियावर डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो लहान मुलांसोबतच मोठ्यांना सुद्धा आवडतात. कारण या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच गंमत येते. या फोटोंची खासियत म्हणजे यांद्वारे डोळ्यांची आणि आयक्यू टेस्टही होते. हेच कारण आहे की, या फोटोंना वैज्ञानिकांनी मानसिक आरोग्यासाठीही चांगले मानले आहे. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 17 हा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी त्यांमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात, कधी प्राणी शोधायचे असतात, कधी फरक शोधायचे असतात तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. फोटोत तुम्हाला सगळीकडे 71 हा नंबर दिसत असेल. मात्र, यात चार ठिकाणी 17 नंबरही आहे. तेच तुम्हाला शोधायचे आहेत तेही केवळ 7 सेकंदात.
ऑप्टिकल फोटो सॉल्व करण्यासाठी किंवा त्यातील गोष्टी शोधण्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असणं गरजेचं आहे. कारण हे वाटतं तेवढंही सोपं काम नाही. या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यांद्वारे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. फक्त यात एक अट असते ती म्हणजे वेळेची. तुम्हाला 7 सेकंदातच यातील 17 हा नंबर शोधायचा आहे.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे 7 सेकंदात या 71 च्या गर्दीत 17 नंबर दिसले असतील तर तुमचं अभिनंदन. मात्र, अजूनही जर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत 17 नंबर सर्कल केलेले पाहू शकता.
वरच्या फोटोत 17 नंबर सर्कल केलेले आहेत.