सोशल मीडियावर हल्ली ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रांचा महापूर आला आहे. एखाद्या चित्रात काहीतरी दडलेलं असतं आणि ते शोधण्याचं आव्हान नेटिझन्सना दिलं जातं. ही गोष्ट बोलणं सोपं आहे, पण जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात दडलेली गोष्ट शोधायची वेळ येते तेव्हा मेंदुच्या नुसत्या झिणझिण्या होतात. अनेकांना दडलेली गोष्टी शोधताना घाम फुटतो. तर काही जण माघार घेऊन टाकतात आणि पराभव मान्य करतात. हे खरं तर भ्रामक चित्र आहे. कलाकार ते अशा प्रकारे डिझाइन करतात की स्पर्धक ते सहजपणे आव्हान पेलू शकत नाही. पण यातच तर खरी मजा आहे.
स्वत:ला तुर्रम खाँ समजता? मग या फोटोतील लपलेला प्राणी ५ सेकंदात शोधून दाखवाच!
आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक मजेदार ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये अनेक टोमॅटोमध्ये तीन सफरचंद लपलेले आहेत. हे चित्र इतकं हुशारीनं बनवलं आहे की तुमची नजर तीक्ष्ण असल्याशिवाय तीन सफरचंद सापडणं कठीण आहे. तीक्ष्ण दृष्टी असल्याचा दावा तुम्ही करत असाल तर मग हे चॅलेंज एकदा घेऊनच पाहा. चला तर मग पाहू या की तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत आणि या चित्रात दडलेले ३ सफरचंद १० सेकंदात शोधून दाखवा. हे चित्र काळजीपूर्वक पहा आणि तीन सफरचंद कुठे आहेत ते सांगा.
खालील फोटोत दडलेले तीन सफरचंद शोधून दाखवा
काही ऑप्टिकल इल्युजन आहेत जे बहुतेक लोक सोडवण्यात अयशस्वी ठरतात. सहसा लोक अशी कोडी पाहून कंटाळतात आणि हार मानतात. पण आम्हाला खात्री आहे की तुम्हाला सफरचंद सापडले असतील. पण तुम्हाला ती सापडली नसली तरी टेन्शन घेऊन नका. आता हे खालील चित्र पाहा. टोमॅटोच्या भाऊगर्दी लपलेली ती ३ सफरचंद नेमकी कुठं आहे याचं उत्तर तुम्हाला सापडेल.
उत्तर-