Optical Illusion : सोशल मीडियावर आजकाल बरेच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो डोळे आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंद्वारे तुमचं चांगलं मनोरंजनही होतं आणि तुमच्या डोळ्यांची व एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची टेस्टही होते. कारण यात तुम्हाला जे दिसतं ते नसतं जे असतं ते सहजपणे दिसत नाही. यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक झाड दिसत आहे. त्याच्या फांद्या दिसत आहे. याच फाद्यांवर काही पक्षी बसले आहेत. त्यांची संख्या एकूण 5 आहे. त्यांनाच तुम्हाला शोधायचं आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे. हे पक्षी शोधण्यासाठी तुम्ही एकतर जीनिअस असायला हवेत नाही तर तुमचे डोळे तीक्ष्ण असायला हवेत.
पहिल्यांदा हा फोटो फारच अवघड वाटतो कारण हे झाड सामान्य झाडासारखं दिसत नाही. ते काळ्या आणि पांढऱ्या रंगात दिसत आहे. पण त्यात जे दिसतं त्यापेक्षा त्यात खूप काही आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी वेळ दिला जातो त्या गोष्टी आणखी अवघड होतात. या फोटोबाबतही तसंच आहे. यातील पक्षी शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला फोटो खूप बारकाईन बघावा लागेल. तेव्हा तुम्ही यातील पक्षी शोधू शकता.
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला यातील काही पक्षी दिसले असतील. तर काही दिसले नसतील. पण लगेच हार मानू नका. तुम्ही ज्या पक्ष्यांचा शोध घेत आहात त्यात दोन मोठे आणि 3 छोटे पक्षी आहेत. बारकाईने आणि डोकं शांत ठेवून बघाल तर तुम्हाला सगळे पक्षी नक्कीच दिसतील. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.