डोकं फ्रेश करण्यासाठी लोक अनेक माइंड अॅक्टिविटीसचा आधार घेतात. यातीलच एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन, जे सॉल्व करणं लोकांना खूप आपडतं. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात, ज्यामुळे लोक कन्फ्यूज होतात. या फोटोंमध्ये कधी काही लपलेलं शोधायचं असतं तर कधी चुका शोधायच्या असतात. ज्यांना डोळ्यांची आणि मेंदुची कसरत करणं आवडतं अशांसाठी आम्ही एक असाच फोटो घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये एक क्लासरूम आणि त्यात बसलेले विद्यार्थी दिसत आहेत. जे आपापल्या कामात बिझी आहेत. पण त्यांच्यात एक कुत्राही बसला आहे. त्याला शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फार बारकाईने बघावा लागेल. कारण यातील कुत्रा सहजपणे दिसत नाही. केवळ तीक्ष्ण डोळे आणि जीनिअस असलेले लोकच त्याला शोधू शकतील. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.
या फोटोतील कुत्रा शोधणं काही सगळ्यांना जमेल असं नाही. तीक्ष्ण डोळे असणारे लोकच दिलेल्या वेळेत या फोटोतील कुत्रा शोधू शकतील. 7 सेकंदात तुम्ही यातील कुत्रा शोधला असेल तर तुमचे डोळे खरंच चांगले आहेत.
पण 7 सेकंदात तुम्हाला यातील कुत्रा दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. जर तुम्ही या फोटोकडे बारकाईने बघाल तर वरून चौथ्या लाइनमध्ये मुलांमध्ये काळ्या रंगाचा कुत्रा बसलेला आहे. जर अजूनही दिसला नसेल तर खालच्या फोटोत तो कुठे आहे ते बघू शकता.