Optical Illusion Challenge: आजकाल लोक टाइमपास करण्यासाठी सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या गोष्टी बघत असतात. अशावेळी लोकांना वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटोही दिसतात जे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंच्या माध्यमातून अनेकदा तुमच्या डोळ्यांची आणि मेंदुची टेस्टही करता येते. अशात जर तुम्हाला काहीतरी शिकता येईल किंवा मेंदुची कसरत होणारा टाइमपास करायचा असेल तर काही ब्रेन टीज़र्सचा आधार घेऊ शकता.
आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. ज्यातील काही फोटोंमध्ये काहीतरी शोधायचं असतं तर काही फोटोंमध्ये चुका शोधायच्या असतात. ज्यामुळे तुमचा टाइमपासही होतो आणि तुमच्या मेंदू आणि डोळ्यांची टेस्टही होते. पण अनेकदा हे फोटो असे फसवतात की, तुम्हाला त्यातील काही शोधता येत नाही. असाच एक फोटो Illusionen.biz वर शेअर करण्यात आला आहे.
या फोटोत तुम्हाला अनेक गोष्टी दिसत असतील. यात तुम्हाला एक गाडी जी एक गाढव खेचताना दिसत आहे. एक कोंबडा आणि एक व्यक्ती स्ट्रॉ ची हॅट घालून दिसत आहे. सोबतच यात एक मोठं झाडही आहे. पण तुम्हाला यात एक दुसरा गाढव शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.
जर तुम्ही बारकाईने हा फोटो बघाल तरच तुम्हाला यातील दुसरा गाढव लगेच दिसेल. पण त्याला शोधणं इतकही सोपं काम नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. यात तुम्हाला गाढवाचं पूर्ण शरीरच नाही तर त्याचा चेहराच शोधायचा आहे.
आम्हाला आशा आहे की, ठरलेल्या वेळेत तुम्ही यातील दुसरा गाढव शोधला असेल. पण जर अजूनही यातील गाढव शोधला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत त्याला तुम्ही बघू शकता.