Optical Illusion Challenge: सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात ज्या बघून तुमचा वेळ चांगला जातो. काही गोष्टी तर अशाही असतात ज्या बघून तुमची वेळची चांगली जाते आणि तुमच्या मेंदुची कसरतही होते. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. या फोटोंमध्ये तुम्हाला काही गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी तुमच्या तीक्ष्ण डोळे असायला हवेत. या फोटोंद्वारे तुमची डोळ्यांची टेस्टही होते आणि तुमचा आयक्यूही समजतो. सोबतच तुमचं मनोरंजनही होतं. म्हणूनच लहान असो वा मोठे सगळ्यांना हे फोटो सॉल्व करणं आवडतं.
हा फोटो Bright Side कडून बनवण्यात आला आहे. तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये कुठेतरी एक लॅंप म्हणजे कंदील लपवलेला आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हेच आहे की, यातील कंदील तुम्हाला 7 सेकंदात शोधून काढायचा आहे. पण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. तुम्हाला यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यात तुमच्याकडे वेळ कमी आहे.
जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील लॅंप दिसला असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
फोटोतील लॅंप फोटोच्या डाव्या बाजूला आहे. आणखी स्पष्ट बघण्यासाठी तुम्ही फोटो उलटा करूनही बघू शकता.