Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात ज्याना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. या फोटोद्वारे लोक गेम्स खेळतात आणि त्या फोटोंमधील रहस्य शोधतात. कधी या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील चुका शोधायच्या असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
तुमच्या समोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी पुलावर उभे दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला झाडं झुडपं आणि नदी दिसत आहे. फोटो तर तसा सामान्य दिसत आहे. पण यात एक मोठी चूक आहे. जी तुम्हाला 10 सेकंदात शोधायची आहे.
जर तुम्हाला यातील चूक दिसली असेल तर तुम्ही जीनिअस आहात. तुम्हाला गोष्टी बारकाईने बघणं आवडतं. पण जर तुम्हाला अजूनही यातील चूक दिसली नसेल तर निराश होऊ नका. कारण यात आम्ही तुमची मदत करणार आहोत.
जर फोटो तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला दिसेल की, झाडांची पाने आणि झाडाचा आकार याकडे इशारा करत आहे की, हवेची दिशा डावीकडून उजवीकडे आहे. पण मुलीचे केस हवेच्या उलट्या दिशेने उडत आहेत. हीच या फोटोतील चूक आहे.