Optical Illusion : अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून लोक आपले डोळे आणि आयक्यू टेस्ट करतात. तुम्हाला टाइमपास करण्यासाठी असे फोटो सॉल्व करणं आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. अशा फोटोंमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात.
पहिल्या नजरेत हे फोटो फारच नॉर्मल दिसतात. पण जेव्हा तुम्ही हे फोटो बारकाईने बघता तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक खूपसारा बर्फ आणि एक घर दिसत आहे. याच फोटोत तुम्हाला 8 स्नोमॅन शोधायचे आहेत. पण हे काही खायचं काम नाही. तीक्ष्ण डोळे असणारेच यातील स्नोमॅन शोधू शकतील. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
क्रिएटर्सने फोटोमध्ये एकूण आठ स्नोमॅन लपवले आहेत. हे इतक्या हुशारीने लपवण्यात आले आहे की, ते शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सहजपणे दिसणार नाहीत. असे ब्रेनटिजर्स चांगले असल्याचं एक्सपर्ट्स सांगतात. कारण अशा फोटोंच्या माध्यमातून लोकांच्या मेंदुची चांगली कसरत होते. जर तुम्हाला यातील स्नोमॅन अजूनही दिसले नसतील तर खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.