Optical Illusion Challenge : सोशल मीडियावर भ्रमित करणाऱ्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. असे फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर केले जातात. जे सॉल्व करण्यात सगळ्यांनाच मजा येते. अशा फोटोंमध्ये तुम्हाला काही लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काही फोटोंमध्ये चुका शोधायच्या असतात. पण यात तुमचा चांगलाच कस लागतो. कारण हे काम काही सोपं नसतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला एक रूम दिसत आहे. रूममध्ये तुम्हाला दोन झाडं दिसत आहेत, एका बास्केट आणि काही इतर वस्तू दिसत आहेत. याच रूममध्ये एक मांजर लपली आहे. जी तुम्हाला 7 सेकंदात शोधायची आहे.
जर तुम्ही 7 सेकंदात या फोटोतील मांजर शोधली असेल तर खरंच तुमची डोळे तीक्ष्ण आहे. पण ज्यांना अजूनही यातील मांजर दिसली नसेल तर त्यांनी निराश होण्याची गरज नाही. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करू.
फोटोत मांजर अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण तिला इतक्या हुशारीने लपवण्यात आलं आहे की, जास्तीत जास्त लोक तिला शोधण्यात फेल झाले. जर तुम्ही बास्केटच्या उजवीकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला मांजर दिसून येईल. खालच्या फोटोत ती कुठे आहे ते तुम्ही बघू शकता.