Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अशा फोटोंमधील गोष्टी शोधण्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवड असते. यातून टाइमपासही चांगला होतो आणि मेंदू व डोळ्यांचीही चांगली कसरत होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक बिबट्या शोधायचा आहे.
अनेकांनी डोळ्यात तेल घालून या फोटोतील बिबट्याचा शोध घेतला पण त्यांना काही त्यात यश आलं नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमची नजर चांगली आहे. तर एकदा फोटोतील सर्व ठिकाणांवर लक्ष द्या आणि बघा तुम्हाला बिबट्या दिसतो का. तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की बिबट्या दिसेल.
लोकांच्या डोळ्यांना कन्फ्यूज करणारा हा फोटो आहे. झालं काय की, बिबट्याचा रंग आणि या ठिकाणी वाळलेल्या गवताचा रंग सारखाच आहे. त्यामुळे अनेकांना लगेच तो दिसून येत नाहीये. त्यात तो उभा नाहीये. लपून बसलाय. त्यामुळे शोधायला अधिकच अडचण येतीय. पण हार मानून कसं चालेल. प्रयत्न तर करावे लागतीच ना?
हा फोटो दिल्लीत राहणारा 34 वर्षीय फोटोग्राफर अनिभन गर्ग याने क्लिक केला आहे. त्याने हा फोटो जयपूरमध्ये अरावली डोंगरांचा दौरा करताना काढला होता. जर अजूनही तुम्हाला यातील बिबट्या दिसला नसेल तर खालच्या फोटोत तो कुठे आहे हे बघू शकता.