Optical Illusion : वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी त्यांमध्ये वेगळे शब्द तर कधी काही वस्तू शोधायच्या असतात. तर काही फोटोंमध्ये प्राणी किंवा फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे. तोही १० सेकंदात.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या मेहनतीने शोधाव्या लागतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला गार्डनमध्ये काही लोक, काही लहान मुले, झाडी, कुत्री दिसत आहेत. यातच एक हत्तीही आहे. जो तुम्हाला १० सेकंदात शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे हे फोटो मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही करतात. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी डोकं आणि डोळे दोन्हींची गरज असते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही हुशार असाल तर नक्कीच तुम्हाला या फोटोतील हत्ती दिसेल.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात तुम्हाला या फोटोतील हत्ती दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण यातील हत्ती कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत हत्ती पिवळ्या रंगाने सर्कल केला आहे.
वरच्या फोटोत हत्ती पिवळ्या रंगाने सर्कल केला आहे.