Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना फारच आवडतात. कारण यातून त्यांचं मनोरंजन होतं आणि मेंदुची कसरतही होते. काही ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर जे दोन फोटो आहेत त्यात तुम्हाला 5 फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. तुमच्या तीक्ष्ण डोळे असतील तरच तुम्ही यातील पाच फरक शोधू शकाल. ज्यासाठी तुम्हाला मेहनतही करावी लागेल. तरच हे शक्य आहे.
तुमच्यासमोर असलेल्या दोन्ही फोटोंमध्ये तुम्हाला 4 मधमाश्या दिसत आहेत. सोबतच झाडावर लटकलेलं एक पोळंही दिसत आहे. पोळ्यातून थोडं मधही बाहेर येताना दिसतंय. पहिल्या नजरेत कुणालाही दोन्ही फोटो एकसारखेच वाटतील. पण बारकाईने बघाल तर यात पाच फरक दिसतील.
10 सेकंदात तुम्ही यातील फरक शोधले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
पहिला फरक तर मधमाश्यांच्या पोळ्यावरच दिसून येईल. पहिल्या फोटोत तुम्हाला पोळ्यावर दोन गोळे बनलेले दिसतील. तर दुसऱ्या फोटोत पोळ्यावर काही खूण नाही. तसेच दुसरा फरक म्हणजे तुमच्या डावीकडे वर जी मधमाशी आहे, त्यात दिसेल. पहिल्या फोटोत या मधमाशीचे डोळे बंद आहेत. तेच दुसऱ्या फोटोत डोळे उगडलेले आहेत. तिसरा फरक वर उडत असलेल्या दुसऱ्या मधमाशीमध्ये दिसेल. चौथा फरक डावीकडे खालच्या मधमाशीमध्ये दिसेल. तर पाचवा फरक उजवीकडे असलेल्या मधमाशीमध्ये दिसेल.