Optical Illusion : मेंदुची कसरत करणारे अनेक गेम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत त्या शोधाव्या लागतात. असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. लोक असे फोटो शेअर करून एकमेकांना यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला केळी शोधायच्या आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोमुळे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. त्यामुळे असे फोटो सॉल्व करणं अनेकांना आवडतं. कधी या फोटोंमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन एकसारख्या दिसणाऱ्या फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात. तर कधी काही नंबर शोधायचे असतात. या फोटोत केळी शोधण्याचं चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्हाला १० सेकंदात पूर्ण करायचं आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला किचनमधील दृश्य दिसत आहे. फ्रीज उघडा आहे आणि त्यात ठेवलेले पदार्थ, भाज्याही दिसत आहे. एक मुलगी उभी राहून केस खात आहे. मागे बेसिनमध्ये काही भांडी आहेत. तसेच मागे पडदाही दिसत आहे. खिडकीतून बाहेर तारे आणि चंद्र दिसत आहे. सोबतच या फोटोत केळी आहेत. त्याच तुम्हाला शोधायच्या आहेत. पण त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
जर तुम्हाला १० सेकंदात यातील केळी दिसल्या असतील तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही केळी दिसल्या नसतील तर निराश होऊ नका. कारण त्या शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही त्या बघू शकता.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवल्या जातात की, त्या सहजपणे दिसत नाही. त्या हुशारीनेच शोधाव्या लागतात.