Optical Illusion : सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात जे बघून लोक कन्फ्यूज होतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. या फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे क्विज आणि गेम्स खेळण्याची संधी मिळते. या फोटोंमध्ये तुम्हाला कधी फरक शोधायचा असतो तर कधी चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला बऱ्याच चपला आणि शूज दिसत आहे. फोटो तसा सामान्य आहे. पण बारकाईने बघाल तर तुम्हाला यातील चूक दिसून येईल. पण यासाठी तुमच्याकडे केवळ 60 सेकंदाची वेळ आहे.
जर तुम्ही 1 मिनिटात या फोटोतील चूक शोधली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर तुम्हाला या वेळेत यातील चूक दिसली नसेल तर निराश होऊ नका. यातील चूक शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
जर तुम्ही फोटोकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला पिंक कलरच्या शूजमध्येच चूक दिसून येईल. पिंक हे दोन्ही एकाच पायाचे आहेत. इतर सगळ्या चप्पल किंवा शूज दोन पायांच्या आहेत. हीच यातील चूक आहे. खालच्या फोटोत तुम्ही हे बघू शकता.