Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात जे बघून लोक अवाक् होतात. कारण या फोटोंमधील गोष्टी किंवा चुका शोधण्यात लोकांना मजा येते. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. या फोटोंच्या माध्यमातून लोकांना क्विज आणि गेम्स खेळायला मिळतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्ही एक चूक शोधायची आहे.
तुमच्या समोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला दोन काळ्या रंगाचे घोडे दिसत आहेत. यात एक चूक तुम्हाला शोधायची आहे. जी तुम्हाला 10 सेकंदात शोधायची आहे.
जर तुम्ही 10 सेकंदात यातील चूक शोधली असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. तुम्ही बारकाईने गोष्टींकडे बघता. पण जर अजूनही तुम्हाला यातील चूक दिसली नसेल तर निराश होऊ नका. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
फोटोमध्ये सगळं सामान्यच दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही मागे उभ्या असलेल्या घोड्यावर बारकाईने नजर टाकाल तर तुम्ही चूक दिसून येईल. जो घोडा मागच्या बाजूला उभा आहे त्या घोड्याला चारऐवजी पाच पाय दिसत आहे. हीच या फोटोतील चूक आहे.