Optical Illusion : सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळ्या फोटोंच्या माध्यमातून क्विज आणि गेम्स खेळायला मिळतात. लोकांना असे फोटो आवडतात ज्यात काहीतरी शोधायचं असतं किंवा या फोटोंमधील चूक शोधायची असते. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला एक घर दिसत आहे. तसेच यात तुम्हाला काही प्राणी आणि एक वृद्ध व्यक्ती दिसत आहे. आजूबाजूला काही झाडंही आहेत. फोटोत तसं तर सगळं सामान्य वाटत आहे. पण यात एक चूक आहे. जी शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंद आहेत.
जर 10 सेकंदात तुम्हाला यातील चूक दिसली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील चूक सापडली नसेल तर निराश होऊ नका. ही चूक शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
फोटोत सगळंच सामान्य दिसत आहे. पण जर तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला दिसेल की, घराच्या चिमनीतून निघणारा धूराची दिशा आणि झाडांची उडण्याची दिशा उलटी आहे. हीच या फोटोतील चूक आहे.