Optical Illusion : सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. लोकांनी या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यात किंवा त्यातील प्रश्नांची उत्तर शोधण्यात मजा येते. यातून त्यांचं मनोरंजन तर होतंच सोबतच त्यांची आयक्यू लेव्हल टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो दिसायला तर साधारण आहे, पण यात एक चूक लपली आहे.
या फोटोत तुम्हाला एक की-बोर्ड दिसत आहे. पहिल्यांदा बघाल तर फोटो तुम्हाला फारच सामान्य दिसेल. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तेव्हाच यात एक चूक दिसून येईल. पण ही चूक शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे.
तुम्ही 10 सेकंदात यातील चूक शोधू शकाल का? जर उत्तर हो असेल तर तुमची डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही स्वत:ला जीनिअस म्हणू शकता. पण तुम्ही यातील चूक शोधू शकले नसाल तरी निराश होण्याची गरज नाही. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो.
खालच्या फोटोत तुम्हाला यातील चूक दिसून येईल. तुम्हीही म्हणाल की, अरे चूक तर आपल्या डोळ्यांसमोरच होती. पण दिसली नाही. तुम्ही जर की-बोर्डवरील नंबर बघाल तर त्यात तुम्हाला दिसेल की, 7 नंबरपर्यंत सगळं काही बरोबर आहे. फण 8 नंबर दोन वेळा आहे.