Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात जे बघून लोकांच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण होतो. हे फोटो ऑप्टिकल इल्यूजन म्हणून ओळखले जातात. या फोटोंच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन होतं आणि सोबतच तुमच्या बुद्धीची टेस्टही होते. आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात दोन तरूण व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहेत. रूममध्ये काही वस्तूही आहेत. तसा तर फोटो सामान्य आहे. पण यात एक चूक आहे. तुमचे जर डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला ती दिसेल.
जर 10 सेकंदात तुम्हाला यातील चूक दिसली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला अजूनही यातील चूक दिसली नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ती शोधण्यात तुमची मदत करू.
या फोटोतील चूक अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण तरीही ती बऱ्याच लोकांना दिसली नाही. फोटोत डाव्या बाजूला बसलेल्या तरूणाकडे बारकाईने बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, त्याने व्हिडीओ गेमचा रिमोट उलटा पकडला आहे. हीच यातील चूक आहे.