Optical Illusion : सोशल मीडियावर अलिकडे डोळे आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. हे फोटो बघण्यात आणि त्यातील रहस्य उलगडण्यात लोकांना चांगलीच मजा येते. कारण यातून त्यांचं मनोरंजन होतं आणि सोबतच मेंदु-डोळ्यांची कसरतही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. ज्यात तुम्हाला एक सॉक्स शोधायचा आहे.
या फोटोत एक मुलगी तिचा एक सॉक्स शोधत आहे. जो तिला सापडत नाहीये. तोच तुम्हाला शोधायचा आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. हे चॅलेंज इतर फोटोंसारखं सोपं नाही. फार अवघड आहे.
फोटोत तुम्ही बघू शकता की, एक मुलगी आहे जिच्या पायात एक सॉक्स आहे. रूममध्ये सगळीकडे तिचा पसारा पडला आहे. ज्यात ती सॉक्स शोधत आहे. पण तो तिला सापडत नसल्याने तुम्हाला शोधायचा आहे. जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असतील तरच तुम्हाला यातील सॉक्स दिसू शकेल.
जर तुम्हाला 10 सेकंद शोधूनही यातील सॉक्स सापडला नसेल तर निराश होऊ नका. हा मुलीचा हरवलेला सॉक्स शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो.
सॉक्स फोटोत तुमच्या नजरेसमोरच आहे. पण रूममध्ये बाकी वस्तू, कपडे पडलेले असल्याने सॉक्स लवकर सापडत नाही. अनेकांना तर हेही वाटतं की, यात सॉक्स नाहीच. पण जेव्हा तुम्ही तुमची नजर बेडखाली ठेवलेल्या गुलाबी बॅगकडे फिरवाल तर तुम्हाला बॅगसमोरच सॉक्स दिसेल. खालच्या फोटोत उत्तर आहे.