Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. जे समोर आहे ते तसं दिसत नाही. तेच तुम्हाला यात शोधायचं असतं. पण हे काम इतकंही सोपं नसतं. त्यामुळेच ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं लोकांना खूप आवडतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही बेडूक शोधायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
असे अनेक फोटो पझल्स तुम्ही सॉल्व केले असतील, पण बऱ्याचदा असंही होतं की, लोक फोटोतील लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी शोधू शकत नाहीत. यातील बेडूक शोधण्यासाठीही तुमच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जर यातील बेडूक शोधायचे असेल तर तुम्हाला खूप बारकाईने बघावं लागेल.
हे ब्रेनटीजर Hiatt Hardware कडून तयार करण्यात आलं आहे. यात तुम्हाला एकूण किती बेडूक आहेत हे शोधून काढायचं आहे. सामान्य अशा पझल्स फोटोत तुम्हाला एक गोष्ट शोधायची असते. पण या फोटोत तुम्हाला बरेच बेडूक शोधायचे आहेत. जे फारच अवघड काम आहे.
जर तुम्ही अनेक प्रयत्न करूनही यातील बेडूक शोधू शकले नसाल तर जरा शांत होऊन सगळीकडे नजर फिरवा. तुमच्यासाठी हिंट ही आहे की, बेडूक हिरव्या रंगाचे आहेत आणि फोटोत सगळीकडे दिसत आहेत.