Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो सगळ्यांनाच फार इंटरेस्टिंग वाटतात. कारण यातून मनोरंजनही होतं आणि चांगला टाइमपासही होतो. ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे त्यात जे समोर असतं ते लगेच दिसून येत नाही. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही फुलं दिसतील. त्यात तुम्हाला फरक शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मानसिक तणाव दूर करण्यासाठी आणि आयक्यू टेस्ट करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला फुलांमधील फरक शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
हे फोटो डोळ्यांसमोर कन्फ्यूजन निर्माण करणारे असतात. त्यामुळे यातील गोष्टी शोधण्यात वेळ लागतो. पण ही खरी परीक्षा असते. कारण यातच तुमची आयक्यू टेस्ट होते आणि एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसे बघता हे दिसून येतं.
जर तुम्ही बारकाईनं हा फोटो बघाल तर तुम्हाला नक्कीच यातील फरक दिसून येईल. जर तुम्हाला 10 सेकंदात यातील फरक दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर काळजी करू नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील फरक बघू शकता.
वरच्या फोटोत फरक सर्कल केलेे आहेत.