Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. हे फोटो मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही फायदे मानले जातात. कारण या फोटोंमधील गोष्टी शोधल्याने किंवा यांमधील फरक शोधल्याने मेंदुची चांगली कसरत होते. त्यामुळेच लहान मुलांसोबत मोठ्यांनाही हे फोटो आवडतात. सोशल मीडियावर आजकाल असे फोटो खूप व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासमोर आणला आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काही फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात. आम्ही जो फोटो घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. फोटोत तुम्हाला खूपसारे २५४(254) दिसत आहे त्यात तुम्हाला २६४(264) हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे ४ सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. जे समोर असतं ते सहज दिसत नाही. ते तुम्हाला मेहनतीने शोधावं लागतं. जेव्हा फोटोमध्ये एकसारख्या अनेक गोष्टी दिसत असतात त्यात एक वेगळी गोष्ट शोधणं फार अवघड होत असतं. तेच या फोटोबाबत आहे. यात तुम्हाला वेगळा नंबर शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
जर तुम्हाला ४ सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो कुठे आहे हे शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत हा वेगळा नंबर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.