Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. या फोटोंमध्ये कधी प्राणी लपलेले असतात तर कधी काही आकृत्या असतात. ज्या तुम्हाला शोधायच्या असतात. याने तुमचं मनोरंजन तर होतंच सोबतच डोळ्यांची आणि मेंदुची टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला दोन चेहरे शोधायचे आहेत.
तुमच्या डोळ्यांसमोर जो फोटो आहेत त्यात एक महिला हाती फूल घेऊन दिसत आहे. सोबतच महिलेसमोर टेबलवर फुलांचे दोन पॉट दिसत आहेत. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला यात दोन चेहरे दिसतील. जे शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे.
या फोटोतील दोन्ही चेहरे शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फार बारकाईने बघाला लागेल. सोबतच तर्कही लावाला लागेल. दोन्ही चेहरे असे लपवण्यात आले आहेत जेणेकरून तुम्हाला ते सहजपणे दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. जरी 10 सेकंदात तुम्हाला यातील चेहरे दिसले नसतील तरी निराश होऊ नका. आम्ही ते शोधण्यात तुमची मदत करतो.
या फोटोतील दोन्ही चेहरे अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहेत. पण ते असे लपवले आहेत की, जास्तीत जास्त लोक ते शोधण्यात फेल झाले आहेत. यातील चेहरे शोधण्यासाठी टेबलवरील पॉटकडे बारकाईने बघा. ज्या पॉटमध्ये फूलं आहेत त्याच्या दोन्ही साइडला चेहऱ्यांची आकृती बनली आहे.