Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये कधी काही वेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील फरक शोधायचे असतात. यात चांगला टाइमपासही होतो आणि मेंदुची कसरतही होते. असे फोटो सगळ्यांनाच आवडतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे.
Fresherslive द्वारे हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्हाला बरेच शब्द दिसत आहेत. पण यातील जास्तीत जास्त शब्द एकसारखे आहेत. यातील एक शब्द वेगळा आहे. या शब्दांमध्ये तुम्हाला ‘DATE’ हा शब्द शोधायचा आहे. फोटोत तुम्हाला सगळीकडे DAET असाच शब्द दिसेल. पण त्यात ‘DATE’ हा शब्दही आहे जो तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल. पण वेळ आहे 15 सेकंदाची.
फोटोत बरोबर स्पेलिंग असलेला शब्द दिसला का? जर तुम्हाला हा बरोबर शब्द सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. फ्रेशर्स लाईव्हनुसार, या ब्रेन टीजरमध्ये फार कमी लोक ‘DATE’ हा शब्द शोधू शकले आहेत. पण तुम्ही हिंमत सोडू नका आणि यातील बरोबर शब्द शोधण्याचा प्रयत्न करा.
एकसारख्या दिसणाऱ्या शब्दांमध्ये अनेकदा लोकांना बरोबर शब्द दिसत नाही. जर तुम्ही बरोबर शब्द शोधला तर तुम्ही जीनिअस आहात. पण अजूनही बरोबर शब्द सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.