Optical Illusion : मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे अनेक फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटो किंवा व्हिडीओंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. असे फोटो किंवा व्हिडीओ पाहून लोकांची झोप उडते. कारण ते सॉल्व करणं फारच अवघड असतं. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
या व्हिडीओत खूपसाऱ्या कार दिसत आहेत. यात एक कार अशी आहे ज्यात ड्रायव्हरही दिसत आहे. हीच लाल रंगाची गाडी बघून तुम्हाला हे सांगायचं आहे की, कार पुढे जात आहे की, मागे जात आहे. याचं उत्तर तुम्हाला 7 सेकंदात द्यायचं आहे.
भ्रम निर्माण करणारा हा व्हिडीओ @Rainmaker1973 नावाच्या X हॅंडलवर पोस्ट करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला विचारण्यात आलं आहे की, कार पुढे जात आहे की मागे जात आहे? या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि 26 हजार लाइक्स मिळाले आहेत. तर तीन हजारांपेक्षा जास्त यूजरने कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे बरोबर उत्तर?
हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिल्यावर जास्तीत जास्त लोक कार मागे जात असल्याचं म्हणाले. पण क्लिप पुन्हा एकदा बारकाईने बघितले तर तेव्हा हे समजतं की, कार हळूहळू पुढे जात आहे आणि बाकीच्या कार वेगाने पुढे जात आहेत. या व्हिडीओने अनेक लोकांना कन्फ्यूज केलं आहे.