Optical Illusion Find A Cat In Bundle Of Woods: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे हजारो फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमधील रहस्य उलगडण्यात अनेकांना मजा येते. कधी फोटोत लपलेला प्राणी शोधायचा असतो तर कधी फोटोत काय दिसतं यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही समजतं. अशा गोष्टी लोकांना खूप आवडतात. असाच एक ऑप्टिकल फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलंय. या फोटोत एक प्राणी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला शोधणं सोपं नाही. शेकडो लोकांनी हा फोटो पाहिला, पण त्यांना यात लपलेली मांजर काही दिसली.
ऑप्टिकल इल्यूजन असलेला हा फोटो तसा सोपा वाटतो. पण तसं नाहीये. यातील मांजर शोधता शोधता तुम्ही घामाघुम व्हाल. भलेही मांजर समोर आहे, पण त्यासाठी तुम्हाला फोटोचा कानाकोपरा शोधावा लागेल. तुम्ही फोटोत बघू शकता की, मोठं मैदान आहे जे शेतासारखं दिसत आहे. तिथे एक ट्रक आहे आणि बाजूला तोडलेली लाकडं आहेत. आता तुम्हाला यात शोधायचं आहे की, मांजर कोणत्या कोपऱ्यात लपली आहे. ज्यांचे डोळे फार तीक्ष्ण आहेत त्यांना मांजर लवकर दिसेल. पण काही लोकांना मांजर शोधण्यात खूप वेळ लागत आहे.
जर तुम्हाला अजूनही यात मांजर दिसली नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. लाकड्यांच्या मधेच कुठेतरी मांजर बसली आहे. पण मांजरीचा रंग लाकडांशी मिळता जुळता आहे. त्यामुळे मांजरीला शोधणं सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला फार बारकाईने मांजरीला शोधावं लागेल. पण हे पझल इतकंही सोपं नाही. काही लोकांनी तर मांजर शोधण्यात हार मानली. अशात ज्यांना खूप प्रयत्न करूनही मांजर दिसली नसेल तर खाली उत्तर आहे.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शेकडो लोकांनी मांजरीला शोधण्याचा प्रयत्न केला. पण काही मोजक्याच लोकांना यातील मांजर दिसली.