Optical Illusion: आपण अनेकदा चित्र विचित्र फोटो पाहतो. तुम्ही जे पाहता ते त्यात नसतेच, दुसरेच काहीतरी असते, असे अनेकदा जाणवते. कोणाला एक चित्र दिसते, कोणाला दुसरे, याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. अशा प्रकारचे गूढ फोटो जगभरातील लोकांना पार गुंतवून ठेवतात. आज असाच एक फोटो आला आहे. त्यात दिसतेय एकच महिला, परंतू खऱ्या चार आहेत. शोधताय ना...
अशा प्रकारचे फोटो शोधण्यासाठी खरेतच चांगली नजर आणि मानसिक एकाग्रतेची गरज असते. कारण असे फोटो तुमच्या बुद्धीशी खेळत असतात. जर तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला फोटोतील फोटो दिसतात. या फोटोतही तसेच आहे. इथे तुम्हाला नीट पाहिलात तर चार वेगवेगळ्या महिला दिसतात. ओलेग शुप्लियाक (Oleg Shupliak) एक युक्रेनी कलाकाराने हे चित्र रेखाटले आहे. त्याची ऑप्टिकल इल्यूजनची चित्रे काढण्यात हातखंडा आहे.
फोर वुमन नावाचे हे चित्र त्याने २०१३ मध्ये काढले होते. पहिल्या नजरेत तुम्हाला त्या चित्रात मोबाईलवर बोलत असलेली महिला दिसेल. जेव्हा त्या महिलेच्या गालाकडे पहाल तेव्हा तिच्या उजव्या हाताच्या तळहातावर दुसरी महिला दिसेल. तिसरी महिली उजव्या हाताच्या बाजुला दिसेल. तिथे तिचे नाक आणि ओढ दिसत आहेत.
चौथी महिला शोधणे जरा कठीण आहे. पहिल्या महिलेच्या पोटावर हनुवटी आणि ओठ दिसत आहेत.