Optical Illusion Find A Frog: ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या डोळ्यांना तीक्ष्ण ठेवण्याची एक मजेदार पद्धत आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो, पेंटिंग्स आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या असतात. याव्दारे तुम्ही तुमचं ऑब्जर्वेशन स्किल आणि आयक्यूची टेस्ट घेऊ शकता. बरेच लोक तासंतास वेळ देऊनही यातील ऑब्जेक्ट शोधू शकत नाहीत. असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. यात तुम्हाला एक लपलेला बेडूक शोधायचा आहे.
या फोटोत एक झाड आहे आणि त्या झाडामधेच एक बेडूक लपून बसला आहे. तोच तुम्हाला शोधायचं आहे. पण त्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असावे लागतील. हा बेडूक शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाचा वेळ आहे. यातील बेडूक डोळ्यांसमोरच आहे. पण तरीही त्याला शोधणं अवघड काम आहे. बारकाईने बघितलं तरच तुम्हाला यातील बेडूक दिसेल.
यातील महत्वाचा मुद्दा असा आहे की, बेडूक समोरच आहे. पण दिसत नाही. कारण त्याचा आणि झाडाचा रंग एकसारखा झाला आहे. त्यामुळेच त्याला शोधणं अवघड आहे. काही लोकांनी यातील बेडूक 5 सेकंदात शोधला. पण बऱ्याच लोकांना असं करता आलेलं नाही. बघा तुम्हीही तुमची नजर तीक्ष्ण करून यातील बेडूक शोधण्याचा प्रयत्न करा. जर प्रयत्न करूनही तुम्हाला बेडूक दिसत नसेल तर खालच्या फोटोत तो तुम्हाला दिसेल.