Optical Illusion Hidden Animal: सोशल एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या तूफान व्हायरल झालं आहे. यात फोटोत तुम्हाला ब्लॅक अॅन्ड व्हाइट कलरमध्ये फूलं आणि पांनाची डिझाइन दिसत आहे. आता यात लपलेल्या प्राण्याला तुम्हाला 10 सेकंदात शोधायचं आहे. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. असा दावा केला जात आहे की, यातील प्राणी शोधण्यात मोठमोठ्या जीनिअसना खूप वेळ लागला. सध्या हा फोटो लोक एकमेकांना शेअर करत आहेत एकमेकांना चॅलेंज देत आहेत.
असं म्हणतात की, ज्यांचे डोळे तीक्ष्ण असतात त्यांनी जर काही सेकंदामध्ये ऑप्टिकल इल्यूजनमधील रहस्य ठरलेल्या वेळेत शोधलं तर त्यांचा मेंदु सुपर ह्यूमनसारखा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो जॅपनीज पिक्चर्स पजल (Japanese Pictures Puzzle) यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत लपलेला प्राणी शोधणं फारच अवघड काम आहे. पण जर मेहनत घेतली तर तुम्ही नक्कीच शोधू शकाल.
पण जास्तीत जास्त लोक या फेल झाल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांनी यातील प्राणी शोधला ते खरंच जीनिअस आहेत. जर तुम्हाला बराच वेळ घेऊनही यातील प्राणी दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर देतो. या फोटोत तुम्हाला एक सरडा शोधायचा आहे. जो या डिझाइनमध्ये तयार करण्यात आला आहे. त्याला फोटोच्या खालच्या भागात शोधून बघा. नक्कीच दिसेल. जर नाहीच दिसला तर खालच्या फोटोत तो कुठे आहे हे दाखवलं आहे.