Optical Illusion: सोशल मीडियावर नेहमीच काही असे फोटो व्हायरल होत असतात जे डोकं चक्रावून सोडतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. हे फोटो मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. असे फोटो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. या फोटोमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अनेकदा असे फोटो पाहिल्यावर आपल्या समोर असलेल्या गोष्टीही आपल्या दिसत नाहीत. त्याच गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. पण हे काही सोपं काम नसतं. सोशल मीडियावरील अशा अनेक फोटोंवर लोक तासंतास वेळ घालवतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, ज्यात तुम्हाला काही कार दिसत आहेत. पण यातील एका कारला साइड मिरर नाहीत. तिच तुम्हाला शोधायची आहे.
ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या या फोटोत तुम्हाला अनेक कार दिसत आहेत. यातील एका कारला साइड मिरर नाही. ही कार तुम्हाला 7 सेकंदात शोधायची आहे.
जर तुम्हाला साइड मिरर नसलेली कार दिसली असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला वेगळी कार दिसली नसेल तर निराश होऊ नका. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.