Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गुपित किंवा चुका शोधणं सगळ्यांनाच आवडतं. कारण याने मनोरंजन तर होतंच सोबत बुद्धीचीही कसरत होते. इतकंच नाही तर अशा फोटोंमुळे तुमचं ऑब्जर्वेशन स्किल आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही सुधारतो. त्यामुळेच सोशल मीडियावर कितीतरी ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Bright Side ने यावेळी चॅलेंज म्हणून एका वाळवंटाचा फोटो शेअर केला आहे. ज्यात 2 उंट दिसत आहेत. या फोटोत एक चूक असल्याचा दावा केला जात आहे. ही चूक तुम्हाला शोधायची आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे कवळ 5 सेकंदाचा वेळ आहे. तशी तर चूक लगेच लक्षात येणारी आहे, पण त्यासाठी तुम्ही जीनिअस असणं फार गरजेचं आहे.
या फोटोत तुम्हाला एका वाळवंटातून 2 उंट चालत जात असल्याचं दिसत आहे. त्यांच्या मागे एक झाड आहे आणि सूर्य आग ओकत आहे. यातच एक चूक आहे. जी शोधण्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल. सोबतत तर्कही लावावा लागेल. चूक समोरच आहे. पण डोकं लावाल तरच ती पकडू शकाल. तसं तर पहिल्यांदा बघाल तर फोटोत तुम्हाला काहीच चूक दिसणार नाही. पण चूक तर आहे.
या फोटोतील चूक शोधण्यासाठी 5 सेकंदाचा वेळ भरपूर झाला. या वेळेचा वापर करून तुमचं कौशल्य सिद्ध करण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. ज्यांना यातील चूक सापडली असेल त्यांचं अभिनंदन. पण ज्यांना अजूनही चूक सापडली नसेल त्यांना आम्ही मदत करतो.
या फोटोत दोन उंट आहेत. त्यांच्यासमोर सूर्य आहे. अशात सूर्याच्या दिशेनुसार, उंटांची सावली खाली वाळूवर दिसायला हवी होती. जी दिसत नाहीये. हीच या फोटोतील एक चूक आहे. जास्तीत जास्त लोकांना ही चूक सापडली नाही.