Optical Illusion Numerical Test: ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच लोकांना हैराण करत असतात. कधी यातील प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात तर कधी त्यातील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. सोशल मीडियावर सतत वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजनही व्हिज्युअल एनालिलिस क्षेत्रातील एक भाग आहे. आजकाल लोक मोबाइल आणि लॅपटॉपवर जास्त वेळ घालवतात. तेव्हा असे फोटो बघतात आणि शेअर करतात. सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेली एक न्यूमेरिकल टेस्टही व्हायरल झाली आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हिज्युअल टेस्ट म्हणून शेअर करण्यात आला होता. हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सोबतच प्रश्न विचारण्यात आला आहे की, 'तुम्हाला या फोटो कोणता नंबर दिसत आहे?'. या ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो सहा आकडे असलेली एक संख्या लपलेली आहे. यात एक सर्कल आहे ज्यात एक संख्या आहे.
हे ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या दृष्टीची टेस्ट करण्याची एक मजेदार पद्धत आहे. उत्तर भलेही तुम्ही देऊ शकाल की माहीत नाही, पण तुम्हाला तुमची नजर कशी आहे हे तरी कळेल. पण या फोटोतील नंबर शोधणं इतकंही सोपं नाही. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये लोकांना चार नंबरचे तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन दिसत आहेत.
सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनुसार, लोकांना 45283 ही संख्या दिसली. तर काही लोकांना 528 ही संख्या दिसली. काही लोक वेगवेगळी उत्तरे देत आहेत. पण यातील बरोबर संख्या '3452839' ही आहे.