Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो तुमचं मनोरंजन करण्यासोबत मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही करतात. कारण या फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे फोटोत समोरच असलेल्या गोष्टी लगेच दिसत नाहीत. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू, कधी वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. आम्ही तुमच्यासाठी वेगळा नबंर शोधण्याचा फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला सगळीकडे 808 असे नंबर दिसत आहेत. पण यात एक वेगळा नंबरही आहे तो म्हणजे 603. 808 च्या गर्दीत तुम्हाला 603 हा नंबर 11 सेकंदात शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो इतकं कन्फ्यूज करतात की, त्यातील गोष्टी सहजपणे दिसून येत नाहीत. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवे. तेव्हाच तुम्ही ठरलेल्या वेळेत यातील गोष्टी शोधू शकता.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे 11 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 603 हा नंबर दिसला असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहेत. खालच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर बघू शकता.
वरच्या फोटो वेगळा नंबर सर्कल केला आहे.