Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर डोकं चक्रावून जातं. कारण यात भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात. हे फोटो पाहिल्यावर लोक कन्फ्यूज होतात. त्यातील गुपित शोधत शोधत लोक थकतात, पण काही मोजकेच लोक त्यातील रहस्य उलगडू शकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोला तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचं उदाहरण मानू शकता. या फोटोत एक साप लपला आहे. जर तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला तो साप दिसेल. भल्या भल्या लोकांना हा साप शोधण्यात अडचण येऊ शकते.
बऱ्याचदा गोष्टी आपल्या समोरच असतात, पण त्या सहजपणे दिसत नाहीत. त्यासाठी बारकाईने आणि डोकं शांत ठेवून त्यांचा शोध घ्यावा लागतो. असंच काहीसं या फोटोसोबतही आहे. लोक हा फोटो बघून कन्फ्यूज झाले आहेत. कारण त्यांना समोरच असलेला साप दिसत नाहीये. जर तुम्हाला कुणाला चॅलेंज द्यायचं असेल तर हा फोटो परफेक्ट आहे.
या फोटोत लपलेल्या सापाला शोधणं काही सोपं काम नाहीये. यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूवर जोर द्यावा लागले. तेव्हाच तुम्ही हा साप शोधू शकाल. यातील साप शोधणं अवघड आहे कारण झाडाच्या पानांचा आणि सापाचा रंग सारखाच आहे. फक्त त्याच्या डोळ्यांमुळे तो ओळखायला येतो. नाही तर त्याला शोधणं अवघड आहे.