Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत ही असते की, हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाही. त्या शोधाव्या लागतात, तेही ठरलेल्या वेळेत. यातच या फोटोंची खरी गंमत असते. ऑप्टिकल इल्यूजनच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 712 हा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो फारच कन्फ्यूज करणारे असतात. त्यामुळे यातील गोष्टी लगेच दिसत नाहीत. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात, तर कधी यात फरक किंवा चुका शोधायच्या असतात. आता जो फोटो तुमच्यासमोर आहे. त्यात तुम्हाला सगळीकडे 71Z हा नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबर आहे तो 712. जो तुम्हाला १० सेकंदात शोधून काढायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असतात की, त्या सहजपणे तुम्हाला शोधता येत नाही. त्यामुळे अनेक लोक तासंतास यातील गोष्टी शोधत असतात. पण काही लोकांचे डोळे इतके तीक्ष्ण असतात म्हणा किंवा ते इतके जीनिअस असतात की, त्यांना लगेच त्या शोधण्यात यश मिळतं. तुम्हालाही वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच लपू शकत नाही तर लागा कामाला.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत तुम्हाला यातील वेगळा नंबर हायलाईट केलेला दिसेल.