Find Snake in the Photo: सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही ऑप्टिकल इल्यूजन असतात. म्हणजे असे फोटो जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. हे फोटो मेंदुलाही कन्फ्यूज करतात. या फोटोंमध्ये आपण जे बघत असतो ते नसतं आणि जे असतं ते सहजपणे दिसत नाही. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला एक साप शोधायचा आहे.
या फोटोत एक गारूडी पुंगी वाजवताना दिसत आहे. पण साप कुठेच दिसत नाहीये. हाच साप तुम्हाला शोधयचा आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमी मेंदू आणि डोळ्यांसोबत खेळत असतात. हे फोटो सॉल्व करताना मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. सोबतच तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजून येतो. असे फोटो वैज्ञानिकांना हे समजून घेण्यात मदत करतात की, एखाद्या फोटोबाबत बोलताना आपला मेंदू कसं काम करतो. हा फोटोही तसाच आहे.
या फोटोची गंमत म्हणजे या साप स्पष्टपणे दिसत नाही. गारूडी बसा आहे, तो पुंगी वाजवत आहे, सापाला ठेवली जाणारी टोपलीही समोर आहे. पण साप काही दिसत नाही. अशात जर तुम्ही यातील साप शोधाल तर तुम्ही जीनिअस ठराल. पण त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे.
कुठे लपलाय साप?
मुळात साप गारूड्याच्या समोर नाही तर त्याच्या हातावर आहे. हा साप त्याच्या हाताला गुंडाळी मारून लपून बसला आहे. हा फोटो असा सेट करण्यात आला आहे की, साप गारूड्याच्या हातावर कपड्यासारखा दिसत आहे. पण बारकाईने बघाल तर दिसेल की, तो सापच आहे.