Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो ही एक आपली डोळ्यांची, मेंदुची टेस्ट घेण्याची पद्धत आहे. सायकॉलॉजिस्ट सुद्धा हे फोटो बघण्याचं आणि त्यातील गोष्टी सॉल्व करण्याचा सल्ला देतात. कारण या फोटोतील गोष्टी सॉल्व करताना किंवा शोधताना मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही दिसतो. त्यामुळेच सोशल मीडियावर असे फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. ज्यामुळे या फोटोंमध्ये समोर जे आहे ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला नेहमीने शोधावं लागतं. आता जो फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. ज्यात हत्तीचं पिल्लू आहे जे बकेटीतील पाणी एका मास्यावर टाकत आहे. फोटो दिसत एकसारखे आहेत पण ते एकसारखे नाहीत. त्यात तीन फरक आहेत. तेच तुम्हाला १२ सेकंदात शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे फार मजेदार असतात. म्हणजे यात तुमच्या समोरच गोष्टी असतात. पण त्या इतक्या हुशारीने लपवण्यात आलेल्या असतात की, शोधता शोधता नाकी नऊ येतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू शोधायच्या असतात, तर कधी वेगळा शब्द किंवा नंबर शोधायचे असतात. यात तुम्हाला फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल.
ज्या लोकांचे डोळे तीक्ष्ण असताता, जे लोक फोकस ठेवून बघतात त्यांना अशा गोष्टी लवकर दिसतात. जर तुम्हाला या फोटोतील तीन फरक १२ सेकंदात दिसले असतील तर तुमचं अभिनंदन, पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील निराशही होऊ नका. दोन्ही फोटोत काय फरक आहे ते तुम्हाला खालच्या फोटोत बघता येईल.
दोन फोटोतील फरक या फोटोत सर्कल केले आहेत.