Optical Illusion : बरेच लोक मेंदुची कसरत करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचा वापर करतात. ही एक मेंदू अॅक्टिव ठेवण्यासाठी मेंदू अॅक्टिव ठेवण्यासाठी एक अवघड आणि मजेदार पद्धत आहे. लहान असोत वा मोठे सगळ्यांना असे क्विज सॉल्व करणं आवडतं. या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील चुका काढायच्या असतात. तुम्हाला सोशल मीडियावर सहजपणे असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघायला मिळतात. आज आम्ही असाच एक फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
आधी फोटो बघा
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक मुलगी दिसत आहे. असं दिसतंय की, ती फार कन्फ्यूज आहे. कारण तिची सायकल कुठेतरी हरवली आहे. आता ती सायकल तुम्हाला शोधायची आहे. चला तर मग डोकं शांत करा आणि तिची सायकल शोधायला सुरूवात करा. पण यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.
या फोटोत तुम्हीला काही इमारती, पाण्याचा कारंजा, दोन बेंच, एक कार, काही झाडी दिसत आहेत. तसेच मुलगी सायकल स्टॅंडजवळ उभी आहे. पण तिथे तिची सायकल नाहीये. तिला प्रश्न पडलाय की, सायकल गेली कुठे? चला तर मग लागा कामाला.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही 7 सेकंदात या मुलीची हरवलेली सायकल शोधली असेल. पण जर अजूनही तुम्हाला या फोटोतील सायकल दिसली नसेल तर निराश होऊ नका. ती शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करू. सायकल कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.