Optical Illusion: तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुम्हाला कधी ना कधी ऑप्टिकल इल्युजन सारखी कोडी नक्कीच समोर आली असतील. आजही तुम्हाला आम्ही असाच एक फोटो दाखवणार आहोत, ज्यात काहीतरी दडलेले आहे आणि ते शोधताना भल्याभल्यांनाही घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ऑप्टिकल इल्युजनचा खूप बोलबाला आहे. या फोटोमध्ये इंग्रजीमध्ये तीन शब्द लिहिलेले आहेत, परंतु काय लिहिले आहे ते लोकांना समजत नाही. तुमच्यासाठी आव्हान हेच आहे की ते तीन शब्द कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. असा दावा केला जात आहे की ९९ टक्के लोक हे शब्द वाचण्यात अपयशी ठरले आहेत. चला तर मग बघूया तुमची नजर किती तीक्ष्ण आहे.
ऑप्टिकल इल्युजन हे अनेक प्रकारच्या फोटोंनी केले जाते. याचे वेगळे पॅटर्न केले जाऊ शकतात. तुम्ही पाहत आहात ते स्केच किंवा अनेक रंगांचे मिश्रण असलेल्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन आहे. हे इल्युजन लोकांच्या डोळ्यात एक भ्रम निर्माण करते. ज्यामध्ये लाखो प्रयत्न करूनही तुम्हाला लपलेल्या गोष्टी सहज दिसत नाहीत. आम्ही आता तुमच्यासाठी असेच काही ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या नजरेची ताकद कळेल. या ठिपक्यांमध्ये कलाकाराने चतुराईने तीन इंग्रजी शब्द लपवले आहेत. तुम्ही सांगा ते शब्द कोणते आहेत.
आम्हाला खात्री आहे की या चित्राने तुमचेही डोळे चक्रावले असतील. जर तुम्ही लपवलेले शब्द पाहू शकत नसाल, तर तुम्हाला एक मदत करतो. चित्रात दडलेला शब्द समजून घेण्यासाठी ९० टक्के डोळे बंद करावे लागतील. या प्रक्रियेचे अनुसरण करताच, तुम्हाला ते ३ शब्द नक्कीच दिसतील. ते शब्द कोणते आहेत. ते नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा.