ऑप्टिकल इल्युजन हा एक प्रकरचा भ्रम आहे. डोळ्यांना जे दिसते ते तसे नसते. अशा प्रकारचे लाखो फोटो, चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक त्यावर काहीशी विश्रांती घेतात आणि शोधण्याचा प्रयत्न करतात. काहीजण तर त्यापेक्षा भारी श़ॉर्टकट मारतात. लोकांच्या कमेंट वाचतात आणि त्यावरून फोटोत शोधू लागतात.
चला तर मग तुम्ही टाईप १ वाले असाल तर तुमच्याकडे या चित्रात केळे शोधण्यासाठी १० सेकंद आहेत. हे ऑप्टिकल भ्रम असणारे चित्र आहे. डोळे आणि तल्लख बुद्धीला थोडा ताण आणि व्यायाम करण्याचे हे उत्तम साधन मानले जात आहे. या फोटोतील केळे लोकांना शोधून सापडत नाहीय. तुम्हाला सापडतेय का पहा...
पेंटिंगमध्ये एका खोलीचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे ज्यामध्ये तीन मुले वेगवेगळ्या पोशाखात दिसत आहेत. याच खोलीत एक केळ्याची प्रतिकृती दिसत आहे. खूप शोधूनही तुम्हाला सापडत नसेल तर आम्ही खाली ते केळे कुठेय ते सांगणार आहोत.
हे केळे चित्राच्या डाव्या बाजुला आहे. एवढे सांगूनही नाही सापडले....
आरशात एक मुलगी दिसते, जिने टोपी घातलेली आहे. तिच्याटोपीवर केळे आहे, जे फक्त आरशातच दिसते. म्हणजेच टोपीमुळे केळ्यासारखा आकार तयार झाल्याचे दाखविले आहे.