Optical Illusion : ब्रेनटीज़र एक पझल असतं, ज्यासाठी तुमच्या रचनात्मक आणि तार्किकतेची गरज असते. अशा फोटोंनी तुमची आयक्यू टेस्टही होते आणि डोळ्यांची दृष्टी कशी आहे तेही समजतं. याच कारणाने डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असे फोटो सगळ्यात वयोगटातील लोकांना आवडतात. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक आपल्य मेंदुवर तर जोर देतातच सोबतच आपलं ऑब्जर्वेशन स्किलही चांगलं करण्याचा प्रयत्न करतात.
असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक डायनिंग हॉल दिसत आहे. ज्यात काही लोकही आहेत. पण या फोटोत एक चूक आहे. जी तुम्हाला 20 सेकंदामध्ये शोधून काढायची आहे. यावरून तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हे दिसून येतं.
या फोटोतील चूक शोधण्यासाठी तुम्हाला डिटेक्टिवसारखा मेंदू आणि नजर तीक्ष्ण पाहिजे. तेव्हाच तुम्ही यातील चूक शोधू शकाल. पण ही चूक शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी फार बारकाईने फोटो बघावा लागेल.
फोटोतील चूक शोधण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. काही लोकांनी यातील चूक शोधली असेल तर काही लोक अजूनही यातील चूक शोधत असतील. अशात त्यांच्यासाठी यातील चूक आम्हीच तुम्हाला सांगणार आहोत.
बारकाईने बघाल तर डायनिंग हॉलमध्ये उजवीकडे तुम्हाला एक लाकडी कपाट दिसेल. त्याच्या दाराला हॅंडल आहे. पण डावीकडे असलेल्या कपाटाच्या दाराला हॅंडलच नाहीये. हीच यातील चूक आहे.