Optical Illusion : अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. असे अनेक रिसर्च आहेत ज्यातून हे समोर आलं आहे की, ऑप्टिकल इल्यूजन मनोविश्लेषण क्षेत्राचा भाग आहे. ज्याव्दारे तुमचा मेंदु आणि डोळ्यांची टेस्ट केली जाते. सोबतच तुमचं मनोरंजनही होतं. असं मानलं जातं की, हाय आयक्यू असलेले लोक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट किंवा चॅलेंज पूर्ण करू शकतात. यातील लपलेल्या गोष्टी शोधणं किंवा त्यातील प्रश्नांची उत्तर शोधण्यात मेंदुची चांगलीच कसरत होते.
असाच ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात खूपसारे हसणारे चेहरे दिसत आहेत. या चेहऱ्यांमध्ये एक माकड लपलं आहे. ज्याला तुम्हाला 15 सेकंदात शोधायचं आहे. तसं तर हे काम सोपं नाही, पण जर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल तर तुम्ही नक्कीच यात लपलेलं माकड शोधू शकाल. जीनिअस लोक नक्कीच यातील माकड लगेच शोधतील.
चॅलेंज म्हणून समोर आलेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये खूपसारे मनुष्यांचे हसणारे चेहरे आहेत आणि सगळ्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. याच चेहऱ्यांमध्ये कुठेतरी लपलेला माकड तुम्हाला शोधायचा आहे. असा दावा केला जात आहे की, या फोटोत लपलेलं माकड केवळ 2 टक्के लोकच शोधून शकले. हा ऑप्टिकल इल्यूजन आयक्यू टेस्टची एक पद्धत आहे. जर तुम्हाला बराच वेळ घेऊनही यातील माकड दिसलं नसेल तर खालच्या फोटोत ते कुठं आहे ते बघू शकता.