ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच नजरेचा धोका. जशी ती गोष्ट दिसते तशी ती गोष्ट असेलच असे नाही. अनेकदा जे काही दिसते ते आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवरुन असे लक्षात येते की सुरुवातीला जे दिसते ते पाहिल्यावर आपल्याला भीती वाटते पण पुढे पाहिल्यावर ते सत्य नाही हे आपल्या लक्षात येते.
डेली मेलने त्यांच्या युट्युब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याला विमानातून खाली फेकतायत असा भास होतो. पण व्हिडिओ जसा पुढे जातो. तसं आपल्या लक्षात येतं की या कुत्र्याला आकाशात नव्हे तर जमिनीवर जमलेल्या बर्फात फेकतात. कुत्रा खेळु लागतो. इसा हा मजेशीर व्हिडिओ आहे.
हा व्हिडिओ पाहताना सुरुवातील आपल्याला या माणसाच्या क्रुरतेचा राग येतो पण दुसऱ्याच क्षणी आपले मत बदलते आणि आपण शांत होतो. ही खऱंतर कॅमेऱ्याची जादू आहे. ज्यात सुरुवातील हा कुत्रा विमानाच्या दरवाज्यात आहे असं आपल्याला वाटतं पण प्रत्यक्षात तो त्याच्या मालकाच्या मांडीवर असतो.