Optical Illusion : जर तुम्ही सोशल मीडिया यूजर असाल तर तुम्ही कधीना कधी ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणजे भ्रम निर्माण करणारे फोटो पाहिले असतील. हे फोटो फारच मजेदार आणि मेंदुला चालना देणारे असतात. हे फोटो मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे एकतर यात काहीतरी शोधायचं असतं नाही तर यातील चुका काढायच्या असतात. या फोटोंमधून चांगलं मनोरंजनही होतं. असं म्हटलं जातं की, हे तुमची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता वाढवतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. हे फोटो शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंजही करतात. यातील काही फोटोंमधील गोष्टींवरून तुमच्या पर्सनॅलिटीचाही खुलासा होतो. मनोचिकित्सकांचं मत आहे की, अशाप्रकारचे माइंड गेम्स खेळल्याने मेंदुची चांगली कसरत होते.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला कॅक्टस दिसत आहेत. पण सोबतच या फोटोत एक मांजर आहे जी लपली आहे. तुमचं चॅलेंज हेच आहे की, तुम्हाला या मांजरीला शोधायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही सात सेकंदात मांजरीला शोधलं तर तुम्ही तुमचा आयक्यू चांगला असल्याचं समजू शकता.
जर तुम्हाला सात सेकंदात या फोटोत लपलेली मांजर दिसली असेल तर तुम्हाला शुभेच्छा. तुमचे डोळे आणि मेंदुमध्ये चांगला ताळमेळ आहे. पण जर अजूनही तुम्ही यातील मांजर शोधू शकले नसाल तर एक हिंट देतो. यातील मांजर काळ्या रंगाची आहे. पुन्हा एकदा ट्राय करा.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही या फोटोतील मांजर आता तरी नक्की शोधली असेल. जर अजूनही दिसली नसेल तर निराश होऊ नका. यातील लपलेली मांजर खालच्या फोटोत सर्कल केली आहे.