Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे समोरच असलेल्या यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. यातून चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदू व डोळ्यांची कसरतही होते. इतकंच नाही तर आपली आयक्यू टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी वा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यांमध्ये काही चुका किंवा फरक शोधायचे असतात. आम्ही जो फोटो घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला ३ चुका शोधायच्या आहेत. ज्यात तुम्हाला एक महिला घरातील हॉलमध्ये चेअरवर बसून पुस्तक वाचताना दिसत आहे. या फोटोत ३ चुका आहेत ज्या तुम्हाला १२ सेकंदात शोधायच्या आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे कन्फ्यूज करणारे असतात. म्हणजे यातील चुका किंवा फरक वा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात. पण त्या सहजपणे दिसत नाहीत. कारण हे फोटो हुशारीने डिझाइन केलेले असतात. या फोटोबाबतही असंच आहे. जर तुम्ही बारकाईने फोटो बघितला तर तुम्हाला नक्कीच यातील चुका दिसून येतील.
यातील चुका शोधण्यासाठी तुम्हाला फोटो डोकं शांत ठेवून आणि बारकाईने बघायचा आहे. तरच तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकाल. जर तुम्हाला १२ सेकंदात यातील चुका दिसल्या असतील तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही चुका दिसल्या नसतील तर निराशही होऊ नका. कारण यात काय चुका आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील चुका बघू शकता.
वरच्या फोटोत चुका हायलाईट केल्या आहेत.