Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर शेअर करून नेहमीच लोकांना ते सॉल्व करण्याचं चॅलेंज दिलं जातं. हे खास प्रकारचे फोटो असतात, जे आपल्या मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अनेक लोक आपल्या रिकाम्या वेळेत काहीतरी वेगळं करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व करतात. हे फोटो फारच मजेदार आणि मेंदुची कसरत करणारे असतात. त्यामुळेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे फोटो आवडतात.
असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक ब्लॅक पॅंथर म्हणजे काळा बिबट्या दिसत आहे. त्याच्या जवळच एक कॅमेरा सुद्धा ठेवला आहे. जो तुम्हाला कमीत कमी वेळेत शोधायचा आहे. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, पण ते 7 सेकंदात यातील कॅमेरा शोधू शकले नाहीत. कारण हे काम इतकंही सोपं नाही.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही आतापर्यंत या फोटोतील कॅमेरा शोधला असेल. जर तुम्ही असं केलं असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील कॅमेरा दिसला नसेल तर निराश होऊ नका. तुम्ही दुसरं एखादं चॅलेंज सॉल्व करू शकता. या फोटोतील कॅमेरा तुमच्या खालच्या फोटोत बघू शकता.