Optical Illusion Vintage Test : ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिल्यानंतर काही सेकंद किंवा काही मिनिटांसाठी लोक कन्फ्यूज होतात. तर त्यातील रहस्य किंवा उत्तर शोधण्यासाठी अनेक तासांचा वेळ लागू शकतो. असे फोटो मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. लोकांना चॅलेंज दिलं की, काही सेकंदांमध्ये यातील उत्तर शोधा. ऑप्टिकल इल्यूजन सायकॉलॉजीचा एक भाग आहे. कारण यातून दिसून येतं की, तुम्ही गोष्टींकडे कशा दृष्टीने बघता.
असाच एक फार जुना ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला एक कुत्रा शोधून काढायचा आहे. हा फोटो 1880 मध्ये पब्लिश करण्यात आला होता. या फोटोत दिसत असलेल्या हरणामध्ये एका कुत्र्याचं स्केच आहे. यात हरिण तर लगेच दिसतं पण यातील कुत्रा शोधणं मात्र अवघड काम आहे.
हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो बारकाईने बघा आणि यात लपलेल्या कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न करा. पण हे काम सोपं अजिबात नाहीये. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तरच तुम्ही यातील कुत्रा शोधू शकता. जर तुम्हाला अजूनही यातील कुत्रा दिसला नसेल तर खाली दिलेल्या फोटोत त्याला हायलाईट केलं आहे.