सोशल मीडियात सतत डोकं भंडावून सोडणारे फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून लोकांचं डोकं काम करणंही बंद होतं. कारण फोटोत नेमचं काय आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही. असाच एक डोकं भंडावून सोडणारा फोटो Reddit वर शेअर करण्यात आला आहे. ज्या यूजरने हा फोटो शेअर केला त्याने या फोटोत जे दिसतंय ते तसं का दिसतं, याबाबत लोकांची मदत मागितली आहे.
हा फोटो २०१६ मध्ये व्हायरल झाला होता. या फोटोतील कपलचे पाय पाहून लोक हैराण झालेत. सोबतच त्यांना हे असं का याचं उत्तरही देता आलेलं नाही. अनेकांना वेगवेगळी कारणे दिली. असं असेल, तसं असेल असं सांगूण पाहिलं. पण नेमकं उत्तर कुणीच देऊ शकलं नाही.
This hurts my brain...
पण अशात एका यूजरने यावर उत्तर दिलं की, 'या फोटोतील मुलाने काळ्या आणि पांडऱ्या रंगाचा शॉर्ट घातला आहे. तर मुलीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. याने इल्युजन झालं आहे. शॉर्ट्सचा काळा रंग पांढऱ्या रंगापेक्षा अधिक उठून दिसतो आहे. हे असं दिसतंय ते केवळ मुलाच्या शॉर्ट्समुळेच. मुलीचा ड्रेस पूर्णपणे दिसतच नाहीये'. आता हे उत्तर वाचून अनेकांना पटलं देखील. पण तुम्हाला काय वाटतं?